लोकांचे जीव घेण्यास आतुर असलेला खड्डा वाट पाहतोय.....?#Bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोकांचे जीव घेण्यास आतुर असलेला खड्डा वाट पाहतोय.....?#Bramhpuri

Share This


लोकांचे जीव घेण्यास आतुर असलेला खड्डा वाट पाहतोय.....?

खबरकट्टा/ब्रम्हपूरी:प्रतिनिधी

गांगलवाडी ते आवळगाव,हळदा , मुडझा या रस्त्याची दैनिक अवस्था एवढी भयानक झाली आहे की, या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे म्हणजे जणू काही गोसीखुर्द कालव्याचे पाटच आहेत असे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याला वाटते .सध्या वर्षाचा शेवट सुरु आहे सुरू झाला आहे. दिवाळीचा सण तोंडावर आहे त्यामुळे रहदारी खूप वाढलेली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किती लोकांचे जीव अपघात होऊन जातात याकडे प्रशासकीय यंत्रणा वाट पाहत आहे की काय असे वाटते.

या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे असे बोलले जात आहे .परंतु जेव्हा रुंदीकरण होईल तेव्हा होईल तो नंतरचा भाग आहे.

सध्या अपघात विरहित वाहतूक करण्यासाठी या ब्रह्मपुरी विधानसभा , जिल्हा परिषद पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रातील राजकीय नेत्यांनी मंत्री महोदयांनी जातीने लक्ष देऊन खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला तंबी द्यावी अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.

या अगोदर खड्या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली तरीपण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावरून अहोरात्र रेती भरलेले टिप्पर आणि ट्रक जात असल्यामुळे याचा त्रास प्रवास करणाऱ्या या परिसरातील लोकांना सहन करावा लागतो मरण यातना भोगाव्या लागत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे अन्यथा या परिसरातील जनतेला कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल किंवा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल असे जनमानसात बोलल्या जात आहे.