ग्रामपंचायत सोनेगाव येथील सचिव-संरपच यांनी केले पदाचा दुरउपयोग :- ग्रामपंचायत सदस्यांनी केली संरपच-सचिव यांची संर्वंग विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार... :- जाहीर नोटीस न काढता दिले मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे.... :- शिवछत्रपती महोत्सव समिती सोनेगाव यांनी पुकारले एल्गार.....#Bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामपंचायत सोनेगाव येथील सचिव-संरपच यांनी केले पदाचा दुरउपयोग :- ग्रामपंचायत सदस्यांनी केली संरपच-सचिव यांची संर्वंग विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार... :- जाहीर नोटीस न काढता दिले मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे.... :- शिवछत्रपती महोत्सव समिती सोनेगाव यांनी पुकारले एल्गार.....#Bramhpuri

Share This

ग्रामपंचायत सोनेगाव येथील सचिव-संरपच यांनी केले पदाचा दुरउपयोग

:- ग्रामपंचायत सदस्यांनी केली संरपच-सचिव यांची संर्वंग विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार...

:- जाहीर नोटीस न काढता दिले मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे....

:- शिवछत्रपती महोत्सव समिती सोनेगाव यांनी पुकारले एल्गार.....

खबरकट्टा/प्रतिनिधी:ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपूरी तालुक्यातील सोनेगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुकान गाळे बांधकाम करण्यात आले.हे दुकान गाळे गावातील प्राथमिक शाळा जवळ असल्याने गावातील शिवछत्रपती महोत्सव समिती ने हे दुकान गाळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिक्षणासाठी वाचनालय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये दुकान गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज केले.पण हे दुकान गाळे आपणास देता येणार नाही.व आपणास दुसरी जागा उपलब्ध करून दिली जाईल असे आपल्या उत्तरात सांगितले.पण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दुष्ठीने वाचनालय करीता योग्य असुन पण ग्रामपंचायत संरपच-सचिव यांनी कोणत्याही प्रकारची जाहीर नोटीस न काढता मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे भाडे तत्वावर दिले.ग्रामपंचायत मालकीचे दुकान गाळे भाडे तत्वावर देताना कोणत्याही प्रकारचे विषय मासिक सभेत न घेता केवळ आपल्या मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे भाडे तत्वावर दिलें . सरपंच- सचिव यांनी नियमांना तिलांजली देत भोंगळ कारभार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.आरोप तक्रारकर्ते मध्ये सोनेगाव येथील चार सदस्य असुन या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर संरपच-सचिव यांनी पदाचा दुरउपयोग केल्याचे दिसून येत आहे.


प्रतिक्रिया:- 

हे दुकान गाळे गावातील प्राथमिक शाळेच्या आवारासमोर असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दुष्ठीने वाचनालय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कडे मागणी केली.पण संरपच सचिव यांनी नियमांना तिलांजली देत मर्जीतील व्यक्तीला दुकान गाळे भाडे तत्वावर दिलें. अशा अधिकारी व पदाधिकारी यांच्या वर चौकशी करून कारवाई करण्यात यावी....

रविंद्र नक्षिने 
शिवछत्रपती महोत्सव समिती अध्यक्ष सोनेगाव