जिल्ह्यात मागील 24 तासात 61 कोरोनामुक्त 107 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू आतापर्यंत 15,483 बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित 2,191#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात मागील 24 तासात 61 कोरोनामुक्त 107 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू आतापर्यंत 15,483 बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित 2,191#chandrapur

Share This

जिल्ह्यात मागील 24 तासात 61 कोरोनामुक्त

107 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत 15,483 बाधित झाले बरे

उपचार घेत असलेले बाधित 2,191,

खबरकट्टा/प्रतिनिधी:चंद्रपूर,

जिल्ह्यात गत 24 तासात 107 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

आज मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील 80 वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 277 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 257, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 107 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 951 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 61 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 483 झाली आहे. सध्या 2 हजार 191 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 32 हजार 111 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 12 हजार 570 नमुने निगेटीव्ह आले आहे. 

नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

****************((((())))))*****************