वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार #tiger-attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार #tiger-attack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाळा नियत क्षेत्रात काल दिनांक 5 आक्टोंबर रोजी वाघाने हल्ला करून खाबाला येथील मारोती पेंदोर यास जागीच ठार केल्याची घटना घडली वाघाचे हल्ल्यात आतापर्यंत 9 लोकांचा बळी गेला असून आता या वाघाला ठार माराच अशी मागणी होत आहे.
मारोती पेंदोर याचे खांबाला गावाला लागून जंगल शेजारी शेती आहे त्यामुळे पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात गेला होता परंतु घरी परत आला नसल्याने आज शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.वाघाने त्याचे 60टक्के भाग खाल्याचे समजते विशेष म्हणजे वाघ हा माणसाला ठार करतो परंतु मांस खात असल्याची अपवाद या नरभक्षक वाघात दिसून येत आहे.
घटनेची माहिती होताच वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले परंतु जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे आता कापूस वेचणीचा हंगाम सुरु होत आहे वाघाचे दहशतीमुळे त्याचा परिणाम होत आहे.