खबरकट्टा / चंद्रपूर :
राज्यात यापूर्वी गेल्या सात – आठ महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी IAS व IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या केल्या होत्या. आता तालुका स्तरावर अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रांत व तहसिलदार या पदावरील अधिकाऱ्यांच्याही उचलबांगड्या केल्या आहेत. संपूर्ण राज्यात तब्बल 176 तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दिनांक 1 ऑक्टोबर 2020 च्या संदर्भाभीन शासन आदेशान्वये कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगाच्या पाश्व्भूमीवर सन 2020-21या आर्थिक वर्षातील बदल्यांसदर्भात करावयाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार व महाराष्ट्र शासकीय कर्मचान्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाल्या वलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 4(5) नुसार तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोपोच्या दृष्टीने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने बदली करण्यात येत आहे.
यात नागपूर विभागातील 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील बदल पुढीलप्रमाणे..
1) श्री. डी. जि. जाधव - तहसीलदार मूल
2). श्री. रवींद्र होळी - तहसीलदार राजुरा
3) श्रीम. सीमा मनोहर गजभिये -तहसीलदार गोंडपिपरी
4) श्री. गणेश जयराम जगदाळे - तहसीलदार सिंदेवाही
5) श्री. जे. बी. पोहनकर - तहसीलदार बल्लारपूर
6) श्री. संजय शिवाजी नागटिलक - तहसीलदार चिमूर
7) श्री. संजय राईंचवार - सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर
वरील सर्वांच्या 1 ऑक्टोबर 2020 च्या महाराष्ट्र शासन आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. याच बदली आदेशानुसार रिक्त जागांवर खालील नवीन अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
1)राजुरा - श्री हरीश गाडे ; श्री. रवींद्र होळी यांच्या रिक्त जागेवर.
2)गोंडपिपरी - श्री. के डी. मेश्राम ; सीमा मनोहर गजभिये -तहसीलदार गोंडपिपरी यांच्या रिक्त जागेवर
3) बल्लारपूर - श्री. संजय राईंचवार ; श्री. जे. बी. पोहनकर - तहसीलदार बल्लारपूर यांच्या रिक्त जागेवर
इतर बदली झालेल्या अधिकाऱ्यांचि पदस्थापना स्वतंत्र आदेशाने करण्यात येणार आहे.