चक्क तहसील कार्यालयातून रेतीच्या ट्रॅक्टरची चोरी? तहसिल ऑफीसचे सुरक्षा रक्षक करतात काय? तहसिल ऑफीसच्या सुरक्षतेबाबत प्रश्न चिन्ह? संमधीतावर कारवाई होनार काय#sindewahi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चक्क तहसील कार्यालयातून रेतीच्या ट्रॅक्टरची चोरी? तहसिल ऑफीसचे सुरक्षा रक्षक करतात काय? तहसिल ऑफीसच्या सुरक्षतेबाबत प्रश्न चिन्ह? संमधीतावर कारवाई होनार काय#sindewahi

Share This

 


चक्क तहसील कार्यालयातून रेतीच्या ट्रॅक्टरची चोरी?

तहसिल ऑफीसचे सुरक्षा रक्षक करतात काय?

तहसिल ऑफीसच्या सुरक्षतेबाबत प्रश्न चिन्ह?

संमधीतावर कारवाई होनार काय?

खबरकट्टा/सिंदेवाही:प्रतिनिधी

नागभिड तालुक्यातील रेती तस्कराची सिंदेवाही महसूल विभागाने जप्त केलेली ट्रॅक्टर तहसील कार्यालयाचे आवारातून चोरून नेल्याने सिंदेवाही पोलिस स्टेशनला F. I. R. दाखल.

रेतीतस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल अधिनियमाच्या अधिकारानूसार कडक कारवाई करण्याची सक्त गरज असल्याचे जाणवते आहे. कारण दिनांक- २७/१०/२०२० रोजी रात्रि १०-३० वाजता महसूल विभाग, सिंदेवाहीच्या नवनियूक्त तहसीलदार सुश्री पर्वणी पाटील यांचे आदेशानुसार तालुका मुख्यालयापासून ७ कि. मी. अंतरावरील पळसगांव ( जाट) येथे नायब तहसीलदार श्री. तोडकर यांचे नेतृत्वाखाली सिंदेवाहीचे राजस्व निरिक्षक, चार तलाठी आणि दोन कोतवाल यांचे सहकार्याने रेती चोरनाऱ्या दोन ट्रॅक्टर ला पकडून, पळसगांव (जाट) येथेच चोरीची रेती भरलेल्या वाहनांचा पंचनामा केला. आणि रात्रोलाच अंदाजे ११-३० ते १२-०० वाजताचे दरम्यान दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करून, रात्री ड्युटीवर असलेल्या शिपायाने लोखंडी गेटला ताला लाऊन तहसील कार्यालयात झोपी गेला. जमा केलेले ट्रॅक्टर सोनापूर (तुकूम) ता. सिंदेवाही येथील ताराचंद गायकवाड याचे मालकीचा असून ज्याचा क्रमांक- MH 34- AP- 1261 असा असून, तळोधी (बा.) तालुका नागभिड येथील सचिन वैद्य याचा असून ज्याचा क्रमांक- MH 36- G- 1307 असा आहे. सदरचा ट्रॅक्टर हा रात्रो ड्युटीवर असलेला शिपाई झोपी गेला असल्याचा फायदा घेत कुणीतरी कार्यालयीन कर्मचारी यांना हाताशी धरून, व आर्थीक व्यवहार करून, लोखंडी गेटला लावलेला ताला तोंडून सचिन वैद्य यांनी जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर चोरून नेला. रेती चोरीचा ट्र्यक्टर हा तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी गेल्याची बाब ही दूसर्या दिवशी दीवस उजाडल्यावर लक्षात आल्याने एकच खडबड माजली रात्र ड्युटीवर असलेल्या शिपायाने त्वरीत तहसीलदार सुश्री पर्वणी पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवीले. तेव्हा तहसील चे आवारातून जप्त केलेले ट्रॅक्टर रात्री २-०० ते ३-०० वाजताचे दरम्यान चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे तहसीलदार मॅडम यांनी जप्ती पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून त्याची विचारपूस करून सचिन वैद्य याचे विरोधात सिंदेवाही पोलिस ठाण्यात F. I. R. दाखल करण्यास सांगितयाने नायब तहसीलदार श्री. तोडकर यांनी पो. स्टे. ला जाऊन, ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्याचे विरोधात F. I. R. दाखल केला असून, अ. प. क्र. ४९३/२०२० नुसार तहसीलचे आवारातून ट्रॅक्टर चोरून नेल्याबद्दल कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ट्रॅक्टर चोरीबाबत पुढील तपास एन. पी. सी. गेडेकर ब. क. नं.-५५८ हे करीत आहेत.