नवविचार : आई च्या तिरडीला मुली व सुनांनी दिला खांदा #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवविचार : आई च्या तिरडीला मुली व सुनांनी दिला खांदा #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - 


हिंदू धर्माच्या परंपरेत स्त्रियांनाकोणत्याही मृत व्यक्तीच्या अंतिम विधीत क्रियाकर्म करू दिले जात नाही. एवढेच काय तर अंतिम मुखाग्नी ही महिलांनी बघू नये याबद्दल अनेक समज-कुसमज आजही आहेत.परंतु आता जमाना बदलला आहे. अनेक पुरोगामी विचारवंतांनी स्त्री-पुरुष समानतेचा पायंडा रोवला.हा पायंडा पुढे चालून कित्येक क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपला सहभाग नोंदविण्यास सहयोगी ठरला. मात्र आजही बहुतांश ठिकाणी मयत झालेल्या व्यक्तींचे शेवटचे क्रियाकर्म विधी महिलांकरवी पार पाडने अपवित्र समजल्या जाते. 
मात्र या विचारांना तिलांजली देत राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे मृत आई च्या तिरडीला मुली व सुनांनी खांदा देत नवा विचार समाजासमोर ठेवला. 


3 ऑक्टोबर 2020 ला विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे, यांचा वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, नातवंड, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.परंतु सुमित्राबाईचा मोठा मुलगा संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास प्रवृत्त केले आणि समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला.जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे तेवढाच मुलीचा सुद्धा आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. संभाजी साळवे व त्यांचे लहान भाऊ मारोती साळवे हे एवढ्यावरच न थांबता मुखाग्नी सुद्धा मुला-मुलींनी एकत्र देऊन परंपरेला झुगारले.साळवे परिवाराने 2019 मध्ये आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता.