ओबिसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या थाळीनाद आंदोलनाची दखल #obc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबिसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या थाळीनाद आंदोलनाची दखल #obc

Share This
✅️ मुंबईत बैठक संपन्न.

✅️महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमीशनची परीक्षा लवकरच घेण्याबाबत राष्ट्रीय ओबिसी महासंघ व ईतर ओबिसी संघटना आग्रही.खबरकट्टा / चंद्रपुर (प्रतीनीधी) :

राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे राज्यभर आमदार, खासदार यांच्या घरासमोर करण्यात आलेल्या थाळीनाद आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथे शुक्रवार (दि.9) ला ओबिसी शिष्टमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत ओबिसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी केली.
या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, इतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार, परीवहन मंत्री मा. अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री मा. दत्तात्रय भरणे, यांच्यासह मुख्य सचिव मा. सिताराम कुंटे, राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य मा. डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर, कोंकण विभागाचे मा. चंद्रकांतजी बावकर, माजी आमदार मा. प्रकाश शेंडगे, मा. तांडेल, मा. कमलाकर दराडे, मा. बबलू कटरे, मा. प्रकाश देवतळे व ओबिसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्हीडीओ कॉनफरंसींगद्वारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले होते.
यावेळी ओबिसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमन्त्र्यांनी दिली. ओबिसी समाजाच्या मागण्यांची आणी प्रश्नांची आपल्याला जाणीव असुन त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करुन ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. 
या समितीने ओबिसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पध्दतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चीत करावीत, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.
इतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थिने सदर बैठक तात्काळ लागली, सभेत पुर्ण सहभाग घेवुन ओबिसी समाजासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
येत्या 15 ऑक्टोबरला मंत्रालयात दुपारी 2 वाजता विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले, इतर मागास बहुजण कळ्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार, यांच्या उपस्थितीत बिंदू नामावली साठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे राष्ट्रीय ओबिसी महासंघाला आमंत्रण देण्यात आले असुन राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर, उपस्थीत राहणार आहे. मुख्यमन्त्र्यांना निवेदन देतांना व चर्चा करतांना राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य मा. डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर.