राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे थाळी वाजवा आंदोलन संपन्न. - न्यायमागन्याकरीता ओबीसी समाज आक्रमक.#obc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे थाळी वाजवा आंदोलन संपन्न. - न्यायमागन्याकरीता ओबीसी समाज आक्रमक.#obc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 8 ऑक्टोबर -

ओबीसी समाजाच्या संवैधानिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज राजुरा येथे थाळी वाजवा आंदोलन करून शाशनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे ,समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे ,कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे ,महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेत्रुत्वात करण्यात आले. 
यावेळी राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या निवासस्थानि निवेदन देण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी पंचायत समिती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयपर्यंत थाळी वाजवत व घोषणा देत पायदळ प्रवास केला. 
यावेळी उपवीभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार अनिल काळू यांनी निवेदन स्वीकारले. 
यावेळी माजी आमदार ऍड. वामनराव चटप, भाजपा नेते सतीश धोटे, शिवसेनेचे नगरसेवक राजू डोहे , बबन उरकुडे , कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती कवडु पोटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,महासचिव बादल बेले,कार्याध्यक्ष कपिल इद्दे ,सहसचिव संदीप आदे, प्रसिध्दी प्रमुख निखिल बोन्डे ,पुंडलिक वाढई , प्रकाश ठावरी , छोटूलाल सोमलकर , डी.आर.गौरकार , नागेश उरकुडे , सुधाकर रासेकर , राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष अडवे, उपाध्यक्ष मधुकर मटाले ,रामरतन चापले, कोशाध्यक्ष साईनाथ परसुटकर, सचिव किसन बावणे, राजू चिंचोलकर , भास्कर वाटेकर , संदीप कोन्डेकर , बाबूराव पहानपटे , प्रदीप पायघण , श्रीकृष्ण वडस्कर , प्रभाकर जूनघरे ,संजय गोखरे ,पुरुषोत्तम गंधारे , दिलीप नीमकर आदींसह मोठ्यासंख्येत ओबीसी बांधव उपस्थित होते.