खबरकट्टा/चंद्रपूर:सिंदेवाही
नवरात्र उत्सव विशेष
सिंदेवाहीतील प्राचिन जागृत महालक्ष्मी
अमृत दंडवते
चंद्रपूर ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सिंदेवाही नगरापासून दोन कि.मी. गावाच्या सरहद्दीवर निसर्गरम्य परिसरात जागृत देवीचे पवित्र स्थान आहे.
पिंपळ आणि मोह या प्रचंड जोड वृक्षाच्या बुडाशी दगडाची एक लहानशी कोरीव मुर्ती प्रचिन काळापासून आहे मुर्तीला 'महालक्ष्मी' नावाने संबोधुन परिसरातील भाविक पिढया न पिढया पुज्या करित आहे.
पूर्वीच्या काळात काही भक्त या परिसरात पहाटे फिरावयास येत होते. मातेच्या परिसरात काही भक्त सह कुटूंब सहभोजनाचा आनंद घेत होते.
या दरम्यान एका भाविकाला त्यांच्या स्वप्नात प्राचिन देवी महालक्ष्मीने दर्शन दिले होते. देवी म्हणाली या जोड वृक्ष्याच्या झाडा खालून मला ऊचलून विधी पुर्वक एका ओटयावर माझी प्रतिष्ठापना करा.व माझे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सोय करुन द्या.
या भक्ताने स्वप्नातील गोष्ट गोविंदभाई पटेल, हनुमंतराव तुम्मे व पा.ना.भिमनवार यांना सांगितली.भक्तांच्या स्वप्नात देवीने दिलेल्या प्रेरणेने स्व. गोविंदभाई पटेल, स्व. हनमंतराव तुम्मे यांनी दहा फुट लांब-रुंद व चार फुट उंचीचा सिमेंट कॉकिटचे भव्य व्यासपीठ बांधून दिले.
त्यावर महालक्ष्मीच्या मूर्तीची विधिपुर्वक प्रतिष्ठापणा केली. त्यानंतर शंकरपट व्यवस्थापक कमिटिने मंदिराचे बांधका पुर्ण केले. देवीपावेतो येण्यासाठी रस्ता नव्हता त्या काळापासून या देवीच्या दर्शनासाठी भाविक येत होते.
विशेषतः मंगळवार व शुक्रवारी देवीचे भक्त देवीजवळ येउन स्वयंपाक करुन भोजनाचा प्रसाद घेतात. या परिसरातील शेतातुन जेव्हा नवे पिक हाती येते तेव्हा शेतकरी आधी या महालक्ष्मीला नैवेद्य' दाखवून मगच नव्या पिकाचे अन्न ग्रहण करतात. दररोज या देवस्थानाजवळ अंदाजे २०० ते ३०० भावीक कुटुंबासह सामूहिक भोजन करतात.
दरवर्षी दसरा चौकात रावण दहनाचा कार्यक्रम होत असतो. यावेळेस सिंदेवाही नगरवासी सांयकाळी महालक्ष्मी दर्शन घेऊन रावण दहन कार्यक्रम उपस्थित राहतात. दरवर्षी विजयादशमीला सिंदेवाहीवासी सीमोल्लंघनासाठी या देवीच्या मंदिराजवळ येतात. देवीचे दर्शन घेऊन सीमोल्लंघनाचा विधी पार पाडतात.
वृध्द, तरुण, महिला, बालक सर्वांची या दिवशी देवीच्या दर्शनासाठी रांग लागलेरली असते. त्या दिवशी देवस्थानावर विद्युत रोशणाई केली जाते. या प्रसंगाला जणू यात्रेचे स्वरुप स्थळाला प्राप्त होते. या जागृत महालक्ष्मीचे महात्म्य प्राचीन काळापासून परिसरातील भाविकांच्या अंतःकरणावर उमटले आहे.
मंदिर प्राचीन असले तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी स्व. गोविंदभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका बोरवेलची व्यवस्था केली. बोरवेलमुळे स्वयंपाकासाठी पाणी वापरणे व फुलझाडांना पाणी देणे आदी सोयी पूर्ण झाल्या आहेत.
स्त्यांच्या दुतर्फा गुलमोहर व सुबाभळीची झाडे लावून रस्त्यांची व मंदिराची शोभा वाढविण्यात आली. फुलांनी बहरलेली गुलमोहरची झाडे व निसर्गरम्य सान्निध्य यामुळे या परिसराच्या मंगलमयता व आनंददायी वातावरणात मोठीच भर पडली आहे. या देवस्थानाजवळ दरवर्षी मकर संक्रांतीला शंकरपट भरविण्यात येते.