खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पदभार स्विकारून अवघे दहा दिवस झाले असताना मागील आठवडाभरात चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या हत्येच्या सत्राने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन कोरोनाच्या काळात कायदा आणि सुव्यस्थेची विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
बंगाली कॅम्पमधील काँग्रेसचा कार्यकर्ता मनोज अधिकारी याची दाताळा एमआयडीसी परिसरातील सीनर्जी वर्ल्डमधील एका फ्लॅटमध्ये कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
या शहरातील बंगाली कॅम्प परिसरात चांगलीच खळबळ माजली. काल ही हत्येची वार्ता पसरताच कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव उमळून येत येजा करणाऱ्या काही गाड्यांची अधिकारी यांच्या समर्थकांनी तोडफोड केली.
या शहरातील बंगाली कॅम्प परिसरात चांगलीच खळबळ माजली. काल ही हत्येची वार्ता पसरताच कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव उमळून येत येजा करणाऱ्या काही गाड्यांची अधिकारी यांच्या समर्थकांनी तोडफोड केली.
पोलिसांनी सोम्य लाठीचार्जे करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरीही आज मनोज अधिकारी याचे शविच्छेदन झाल्यानंतर ऍम्ब्युलन्स ने शव घरी पोहोचवत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान अजूनही त्यांच्या वास्तव्य परिसरात समर्थकांची गर्दी वाढत असून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे.
या गर्दी मध्ये एक लोकप्रतिनिधी कुटुंबियांचे सांत्वन करण्यास गेले असता त्यांनाही गर्दीतील एकाने चपराक ठेऊन दिल्याचे वृत्त असून एकंदर मनोज अधिकारी यांच्या हत्येवरून परिसर तणावग्रस्त आहे.
मनोज अधिकारी यांची नेमकी मर्डर मिस्ट्री काय? याबाबत जिल्ह्यात चर्चा वायरल असून दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असली तरीही नेमके प्रकरण काय याबाबत सर्वच अधिकारी व कर्मचारी कमालीची गुप्तता बाळगून आहेत.
दरम्यान काल ही हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर बैरागी नामक एका आरोपीचे काही विडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे. त्या वायरल विडिओ नुसार ही हत्या घडवून आणण्यामागे एक नगरसेवक व महिलेचा हाथ असल्याचे हा बैरागी नामक व्यक्ती सांगताना दिसतोय. तर त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या विडिओ मध्ये या नगरसेवकाचा व महिलेचा हाथ असावा अशी थातुरमातुर बायानी करताना दिसतोय. तर तिसऱ्या विडिओ मध्ये पुन्हा त्या नगरसेवक व महिलेचा ही हत्या करण्याचा 4 दिवसांपासून प्लान होता व मी सोबत असल्याने हे शक्य होऊ शकले नसावे. आज मी वरोरा गेलो असता परतताना मला एक कॉल आला व इरई नदीच्या डॅम वर चाबी ठेऊन असल्याचे सांगितले. मी ती चाबी घेऊन फ्लॅटवर आलो असता ही हत्या दिसली असं बैरागी बोलतोय व पुढून कोणीतरी त्याला हाथबांधणी करून प्रश्न विचारत असल्याचा व एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आहे.
घटना उघडकीस येऊन 24 तास लोटले असले तरीही पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत बयान या प्रकरणात दिले नसून फक्त नगरसेवकासहित विडिओ मध्ये दिसणाऱ्या त्या बैरागी नामक व्यक्तीला अटक केली व विडिओ मधेच बैरागी नाव घेत असलेली महिला सानी धाबर्डे हिच्या शोधार्थ पथक रवाना झाले असल्याचे कळते.
गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील विविध खुनाच्या 8 घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक मोडकडीस येत आहे.
मनोज अधिकारी हे शहरातील सुप्रसिद्ध बंगाली कॅम्प दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष व काँग्रेस चे सक्रिय सेवाभावी कार्यकर्ता असल्याने व त्याच परिसरातील नगरसेवकाला अटक झाल्याने या हत्येची चंद्रपूर शहरातील जनसामान्य ते राजकीय वर्तुळात कालपासून प्रचंड चर्चा असून मनोज अधिकारी यांचीं नेमकी मर्डर मिस्ट्री काय हे उलगडणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
काल मनोज अधिकारीची हत्या झाल्यानंतर आज शविच्छेदन करून मृत् शरीर अधिकारी कुटुंबीयांच्या बंगाली कॅम्प परिसरात पोलीस प्रशासनाने पोहोचते केले. ज्या ऍम्ब्युलन्स ने हे शव घरी पोहोचले ती ऍम्ब्युलन्स मनोज अधिकारी यांनी दोनच महिन्यापूर्वी आपल्या सेवाभावी वृत्तीतून जनतेच्या सेवार्थ उपलब्ध करून दिली होती.