*मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न* रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग#mul - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

*मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न* रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग#mul

Share This


*मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न*

रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग#mul

खबरकट्टा/मूल:प्रतिनिधी

कोरोनाच्या महासंकट काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुल शहरातील तथा तालुक्यातील असंख्य युवकांनी जवळपास ५० च्या वर युनिट रक्तदान केले. रक्तदान हेच महादान हा संकल्प ठेवून उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या उस्फुर्तपणाने सहभाग घेऊन रक्तदानाचे कार्य केले. उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात अत्यंत उत्तम पद्धतीने रक्तदानाचे कार्य पार पडले.उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम करुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे आभार मानले.

सदर रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडणारे उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे, आरिफ खान पठाण, अजय दहिवले, साहिल खोब्रागडे, निहाल गेडाम, हर्षल भुरसे, मिटुसिंग पटवा तथा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.