ब्रेकिंग अपहरण चंद्रपूर :बालकाचे अपहरण करून चाकूने वार : सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेने घटना उघडकीस : अपहरणकर्ती ती महिला कोण व उद्देश काय - गुलदस्त्यात.. !! #kidnapping-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग अपहरण चंद्रपूर :बालकाचे अपहरण करून चाकूने वार : सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेने घटना उघडकीस : अपहरणकर्ती ती महिला कोण व उद्देश काय - गुलदस्त्यात.. !! #kidnapping-at-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:- शहरात लागोपाठ हत्येच्या घटनेने चंद्रपूर हादरून गेले असता तोच एका 8 वर्षीय बालकाच अपहरण करून त्याच्यावर चाकूने वार करीत हत्या करण्याचा संतापजनक प्रकार काल 1 ऑक्टोबर ला उघडकीस आला. 
सविस्तर माहिती नुसार तुकूम परिसरात राहणारे हुणेश्वर पाटील यांचा 8 वर्षीय मुलगा वेदांत पाटील सायंकाळी मधूबन प्लाझा जवळ खेळत असताना अचानक गायब झाला. मुलगा घरी न आल्याने त्याची शोध मोहीम वडिलांनी सुरू केली असता त्याचा कुठेही पता लागला नाही त्यानंतर लगेच वेदांतच्या वडिलांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. 
काही वेळ उलटल्यावर 2 इसमानी 1 महिला बालकाला रामनगर पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी जो प्रकार सांगितला तो संतापजनक होता. तो मुलगा दुसरा कुणी नसून वेदांत होता, त्याने आपबिती सांगितली की 1 महिला दुचाकीवर बसून आली व म्हणाली की बाळा चल आईस्क्रीम खाऊ असे आमिष दिले निरागस वेदांत त्या महिलेच्या गाडीवर बसून गेला.
त्या महिलेने गाडी एमइएल च्या दिशेने वळवली असता वेदांत पूर्णपणे घाबरून गेला, नंतर लोहारा जवळील हनुमान मंदिर जवळ त्या महिलेने गाडी थांबवली. काही न बोलता त्या महिलेने वेदांतवर चाकूने वार करायला सुरुवात केली. वेदांतच्या गळ्यावर व पोटावर दुखापत झाली. त्याचवेळी चिचपल्ली धाब्यावर जेवायला जाणारे बाळू डंबारे व रुस्तम पठाण यांना मुलाचा आवाज आला. अंकल बचाओ ते लगेच थांबून आवाजाच्या दिशेने गेले असता 1 लहान मुलगा व महिला तिथे आढळले, वेदांत ने पूर्ण हकीकत दोघांना सांगितली असता त्या दोघांना घेऊन पठाण व डंबारे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला आणले. बेपत्ता मुलगा हा वेदांत असल्याची खातरजमा पोलिसांनी करीत त्याच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनला बोलाविले. त्या महिलेवर पोलिसांनी अपहरण व जीवे मारण्याचा गुन्हा नोंद करीत अटक केली. रात्री जर त्या क्षणी वेदांत चा आवाज डंबारे व पठाण यांनी ऐकला नसता तर वेदांत कदाचित आज ह्यात नसता. चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी का वाढत आहे? याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.