जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने विशेष अमलबजावणी #kalajadu - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने विशेष अमलबजावणी #kalajadu

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड : 


तालुकयतील कोटगाव यथे बाबुराव शिवराम मेश्राम वय ७२ वर्ष हे व्यवसायाने न्हावी आहेत यांनी जादूटोना केला, करणी केली या अंधश्रद्धा पायी मनोहर हरडे व त्याच्या कुटुंबीयांनी 26 सप्टेंबर ला सायंकाळी बेदम मारहाण केली व प्राण घातक हल्ला केला. 
सदर घटनेची नोंद ठाणेदार मडामे साहेबानी वेळीच घेऊन आरोपी विरोधात अपराध क्रमांक २६३/२० भा.द.वि ३२४, ४५२, ५०६, ५०४ जादूटोना विरोधी कायदा कलम ३(१) २ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तसेच कोतुळना यथे सरोज भास्कर दुधे यांचा विरोधात अपराध क्रमांक २६७/२० अनव्ये जादूटोना विरोधी कायदा अंतर्गत कार्यवाही केली. 
मौजा तिवरला यथे देविदास मनोज धारने व इतर यांचा विरुद्ध भा.द.वि ३२४, ३२५, ५०६, ३४, व जादूटोना विरोधी कायदा ३(२)१ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कानपा येथे सुद्धा जादूटोना अंतर्गत कारवाही करण्यात आली आहे.सदर प्रकरणात अ.भा. अनिस चे अध्यक्ष ऍड गोविंद भेंडारकर, प्रा बालाजी दमकोंडावार डॉ.शशिकांत बांबोळे, विकी शेंडे यांनी सदर प्रकरणात ठाणेदार मडामे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली व कोटगाव यथे जादूटोना विरोधी कायदयाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊन काळात नकारात्मक विचाराचे प्रमाण वाढल्याने अंधश्रद्धा चे प्रमाण वाढले आहे. तरी शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन करिता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने विशेष अमलबजावणी करावी व अश्या घटनेची नोंद घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कक्ष स्थापन करण्यात यावे. अशी मागणी ऍड गोविंद भेंडारकर व प्रा बालाजी दंमकोंडावार यांनी केली आहे. ठाणेदार प्रमोद मडामे यांनी वेळीच नोंद घेऊन गुन्हा नोंदविल्या बदल समितीने एका पत्रकाद्वारे आभार मानले आहेत.