हाथरस घटनेविरोधात बल्लारपुर पोलिस मित्र परिवार च्या वतीने जाहिर निषेध #hathrus - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हाथरस घटनेविरोधात बल्लारपुर पोलिस मित्र परिवार च्या वतीने जाहिर निषेध #hathrus

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या व त्यात गंभीर जखमी झाल्याने दलित मुलीच्या मृतदेहावर पोलासांनी मध्यरात्रीनंतर परस्पर अंत्यसंस्कार उरकून घेतले यावेळी पोलीसांनी मुलीच्या कुटुंबियांना त्यांच्या घरात डांबून ठेवले होते.या उद्वेगजनक प्रकारामुळे बल्लारपुर पोलिस मित्र परिवार चा वतीने नगर परिषद चौक येथे योगी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला.
या दरम्यान संविधानावर विश्वास असणा-यांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण अच्छे दिन आएँगे या सरकारच्या कारकिर्दित बलात्कार,माँबलिंचींग तसेच अल्पसंख्याक वरील हल्ले वाढले असून लोकशाहीची पायमल्ली होत आहे तसेच याप्रकरणातील ज्यांनी माणूसकीला काळीमा फासण्याचे दुष्कृत्य केले आहे त्यांना मृत्युदंड देण्यात यावे असे प्रतिपादन केले.
त्यावेळी पोलीस मित्र महिला अध्यक्ष सीमा जयस्वाल आदित्य शिंगाडे अभिषेक सातोकर प्रतीक धद्रे प्रचलित धंद्रे प्रेम भगत रवी यादव तथा महिला पोलीस मित्र आचल चौधरी, अनुषा कलवला, तबस्सुम पठाण, पूजा कणकम , मुस्कान वर्मा ,किरण वर्मा ,झीनत शेख, अंजली सरोज ,पुष्पा यादव सपना कल्पिलेली उपस्थित होते.