गडचिरोली जिल्ह्यातील मोठी घटना चकमकीत पाच नक्षलवादी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा#gadchiroli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचिरोली जिल्ह्यातील मोठी घटना चकमकीत पाच नक्षलवादी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा#gadchiroli

Share This


गडचिरोली जिल्ह्यातील मोठी घटना चकमकीत पाच नक्षलवादी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

खबरकट्टा/गडचिरोली:प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाने धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोसमी-किसनेली गावच्या जंगल परिसरात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. आज रविवारी (ता.18) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान आज धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोसमी-किसनेली गावच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यादरम्यान जंगलात फिरत असलेल्या नक्षलवाद्यांशी पोलिसांचा सामना झाला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. यात दोन पुरुष, तर तीन महिला नक्षलवादी समाविष्ट आहेत. पोलिसांनी या भागात अभियान अजून तीव्र केले आहे.

नवनियुक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलिस अधीक्षक मनिष कलवनिया व पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखालील विशेष अभियान पथकाने ही कामगिरी पार पाडली.