शॉर्ट सर्कीटने शासकीय आश्रमशाळेच्या कार्यालयास आग #gadchiroli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शॉर्ट सर्कीटने शासकीय आश्रमशाळेच्या कार्यालयास आग #gadchiroli

Share This
खबरकट्टा / गडचिरोली : 


चामोर्शी तालुक्यातील घोट जवळील भाडभिडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या कार्यालयास शॉर्टसर्किटने आग लागली घटना घडली. या घटनेत जवळपास २ लाख २९ हजार ६०० रुपयांचे साहित्य जळून खाक झाले मात्र कोणतीही जिवीत हानी घडली नाही.
प्राप्त माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास अचानक आश्रमशाळेतील कार्यालयास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये मॉनिटर, सिपीयु , संगणक साहित्य, स्पीकर संच, झेरॉक्स मशीन, प्रिंटर, फ्रीज, टेबल, फोन, कुलर, पंखे,व अन्य साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत २ लाख २९ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे भाडभिडी येथे खळबळ निर्माण झाली आहे.