गडचांदूरात जुगार खेळताना शहरातील स्वयंभू जनसेवक जुगाऱ्याना अटक#Gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूरात जुगार खेळताना शहरातील स्वयंभू जनसेवक जुगाऱ्याना अटक#Gadchandur

Share This


गडचांदूरात जुगार खेळताना शहरातील स्वयंभू जनसेवक जुगाऱ्याना अटक,

खबरकट्टा/प्रतिनिधी

काल गडचांदुर शहरात एकापाठोपाठ दोन असे गुन्हे घडले ज्यात एक मोठे वाहन लाखोच्या दारुसाठयासह पकडण्यात आले तर दुसरीकडे शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक जे नगरपरिषदेच्या रिंगणात उतरले होते असे भावी जनसेवक ३० ऑक्टोंबर रोज शुक्रावरला रात्री शहरातील वॉर्ड क्रमांक 3 बाबासाहेब आंबेडकर भवणामागील भागात जुगार खेळताना 6 आरोपींना पकडले.

पोलिस शिपाई संदीप आडकिने यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला, मिलिंद नारायण देवतळे, नितीन अशोक भगत, राहुल रतनसिंग निरंजने, तरुण बाळकृष्ण धोंगळे, आकाश रमेश पेंदोर, विलास लटारू देरकर सर्व राहणार गडचांदुर यांना जुगार खेळताना पकडले. यावेळी रोख रक्कम १७०० रुपये आढळले.

हे सर्व आरोपी पत्ते खेळत आढळले. अप क्र.३७५/२०, १२ (अ) महा. जू. का. अंतर्गत तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघनही केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मेश्राम हे करीत आहे