शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत जिल्हा स्तरीय समितीची सभा #farmer-suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत जिल्हा स्तरीय समितीची सभा #farmer-suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोंबर: 

जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत नियंत्रण समितीची सभा दर महिन्यात आयोजित करण्यात येते. हि मासिक सभा दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी, शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत जिल्हास्तरीय समितीच्या समोर एकूण 14 प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये, सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र, चार प्रकरणे प्रलंबित आहेत.
या बैठकीत ऑगस्ट 2020 पर्यतच्या शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे नापीकी, कर्जबाजारीपणा, कर्जपरतफेडीचा तगादा, या तीन कारणानी आत्महत्या केल्यास शासनाकडून आर्थिक मदत देय आहे. शेतकरी कर्जबाजारीपणा आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा घेण्यात आला.
तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा मुळेच आत्महत्या करण्यात आलेले त्यांच्या वारसाना मदत मिळेल असे तालुका स्तरीय समितीने अहवालात मत व्यक्त केले आहे. इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, तहसिलदार सचिन पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम, विवेक कोहळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.