दुर्मिळ : चंद्रपूर जिल्ह्यात आढळला अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोब्रा #Extremely rare albino spectacled cobra found in Chandrapur district - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्मिळ : चंद्रपूर जिल्ह्यात आढळला अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोब्रा #Extremely rare albino spectacled cobra found in Chandrapur district

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

यंत्रयुगात अनेक जाती नष्ट झाल्यात तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या नाव काढले तरी अंगावर काटा उभा राहतो. राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथे अत्यंत विषारी म्हणून ओळखला जाणारा अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोब्रा आढळला असून या अतिदुर्मिळ समजला जातो.

हा अल्बिनो स्पेक्टेबल कोब्रा जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशिय संस्थेच्या सर्पमित्रांना पकडला. राजुरा तालुक्यातील चंदनवाही गावात गणपत मडावी यांच्या घरी पांढरा-पिवळसर नाग निघाल्याने दहशत माजली.
गावातील लोकांनी सर्पमित्रांना पाचारण केले. गावकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहु. संस्थेच्या सर्पमित्रांनी अत्यंत चपळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड जातीचा नाग मोठ्या शिताफीने पकडला.
अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोब्रा हा अत्यंत दुर्मिळ जातीचा असून अनुवंशिकतेच्या कारणाने आणि मेनॅलिनच्या कमतरतेने याचा रंग हा पांढरा-पिवळसर झाला आहे. ब्लॅक कोब्रा बहुतांश जागी आढळतात, पण अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोब्रा सहज आढळत नाही. 
या सापाची नोंद स्थानिक वनविभातात करण्यात अली असून त्याला पुन्हा चंदनवाही लगतचा झुडपी जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्र प्रविण लांडे, अमर पाचारे, संदीप आदे, शेखर खोके, प्रविण दुरबडे, सत्यपाल मडावी, स्वप्नील बट्टे यांनी सांगितले.