छळ : डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, अवैध प्रॅक्टिस साठी दबाव : पैश्यांसाठी हपापले सुशिक्षित कुटुंब :मूळच्या ब्रम्हपुरी येथील अहेरी स्थानिक डॉक्टसहित कुटुंबावर गुन्हा दाखल #dowry system - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

छळ : डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, अवैध प्रॅक्टिस साठी दबाव : पैश्यांसाठी हपापले सुशिक्षित कुटुंब :मूळच्या ब्रम्हपुरी येथील अहेरी स्थानिक डॉक्टसहित कुटुंबावर गुन्हा दाखल #dowry system

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी 


वर वधू दोघेही एमबीबीएस डॉक्टर असूनही मुलीच्या पुढील शिक्षणासाठी दहा लाख रुपये वधुपित्याकडून वरपक्षाने उकळल्याची व हुंड्यासाठी सासर कडून सतत त्रास दिला जात असल्याची तक्रार एका डॉक्टर महिलेने केली आहे. 
सविस्तर माहिती नुसार डॉ अमोल पेशट्टीवार मूळचा पेठ वार्ड ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून २०१५ साली त्याचा विवाह यवतमाळच्या डॉ किशोर मेक्रतवार यांच्या स्नेहल या डॉक्टर कन्येशी झाला. लग्नावेळी पेशट्टीवार कुटुंबीयांनी सुनेच्या डिजिओ पदवी शिक्षणासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याने वधुपित्याने डॉ अमोल च्या बँक खात्यात सदर रक्कम वळती केली. लग्नानंतर डॉ स्नेहल यांनी डिजिओ पदवी प्राप्त केली आणि हे डॉक्टर दाम्पत्य २०१७ ला अहेरी जि. गडचिरोली येथे स्थायिक झाले. 
आपल्या पदवी शिक्षणासाठी दहा लाख रुपये खर्च आला नाही त्यामुळे वडिलांना पैसे परत द्या अशी मागणी पत्नीने केली परंतु डॉक्टर पती पैसे परत देण्यास तयार झाला नाही, त्यामुळे दोघात वाद होऊन भांडणं झाली. पती पत्नीला या कारणावरून शिवीगाळ करू लागला. या कालावधीत अहेरीत डॉ अमोल पेशट्टीवार याने दवाखाना उभारला. या दवाखान्याचे रजिस्ट्रेशन नसल्याने, रजिस्ट्रेशन करावे अशी विनंती डॉक्टर पत्नीने केली. 
दवाखाना थाटण्यासाठी माहेरहून आणखी पैसे आण आणि नोंदणीकृत नसलेल्या दवाखान्यात अवैध प्रॅक्टिस कर म्हणून डॉक्टर पती व सासरच्यांनी दबाव आणल्याची तक्रार डॉक्टर पत्नीने केली आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ अमोल केशव पेशट्टीवार (वय ३५) रा. जोशी वार्ड अहेरी. असे पत्नीला हुंड्यासाठी त्रस्त करणाऱ्या पतीचे नाव असून त्याचा बाजारवाडी अहेरी येथे दवाखाना आहे. 
या दवाखान्याचे शासनाकडे रजिस्ट्रेशन झाले नाही तरीही हा दवाखाना अवैधपणे चालविल्या जात असून या दवाखान्यात उपचार करण्यासाठी दबाव टाकल्या जात असल्याची तक्रार त्याच्या डॉक्टर पत्नीने केली आहे.


मात्र रजिस्ट्रेशन नसलेल्या दवाखान्यात रुग्णांवर अवैध उपचार करण्यास देखील आपल्याला पती डॉ अमोल पेशट्टीवार याने उपचार करण्यास भाग पाडले त्यामुळेही डॉक्टर दाम्पत्यात वाद झाले, असे तक्रारीत नमूद आहे. एव्हढेच नव्हे तर पेशट्टीवार कुटुंबीय डॉ सुनेला पागल संबोधून हिणवितात व मानसिक त्रास देतात. 
या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी डॉक्टर पती अमोल केशव पेशट्टीवार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. 

डॉ स्नेहल यांचे गडचिरोली अर्बन बँकेत असलेल्या जॉईंट खात्यातून एफडी चे चार लाख रुपये बनावट स्वाक्षरी करून पतीने काढून घेतले. अहेरीला स्थायिक झाल्यानंतर घरी येणारे सासरे केशव पेशट्टीवार हे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून शिवीगाळ करीत असल्याची तक्रार यापूर्वी देखील २० जानेवारी २०२० ला सुनेने अहेरी पोलीस ठाण्यात केली आहे. 
यात अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. हा राग मनात ठेऊन २७ सप्टेंबर २०२० ला सासरे केशव पेशट्टीवार पुन्हा अहेरीला बाजारवाडीतील दवाखान्यात आले, यावेळी डॉक्टर पतीला सांगून दवाखाना बांधण्यासाठी सुनेला माहेरहून पैश्याची मागणी करण्यास सांगितले. त्यावरून वाद होऊन डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली, यावेळी सासरे देखील अंगावर धाऊन आल्याचे सुनेने तक्रारीत म्हटले आहे. यावेळी काही मद्यपी गुंडांना आणून सासरच्यांनी धमकाविले, घराचे कुलूप कापून रोख रक्कम चोरून नेली. पती, सासरे, सासू, दीर व जाऊ वारंवार हुंड्यासाठी छळतात, मारहाण करतात, अपमानास्पद मानसिक त्रास देतात त्यामुळे जीवित्वास धोका असल्याची तक्रार सून डॉ स्नेहल पेशट्टीवार यांनी पोलिसांत दाखल केल्यानंतर अहेरी पोलीस ठाण्यात आरोपी पती डॉ अमोल पेशट्टीवार, सासरे केशव पेशट्टीवार, सासू कुसुम, दीर विशाल आणि जाऊ चैताली यांच्याविरुद्ध भादंवि चे कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदार डॉ स्नेहल पेशट्टीवार यांनी केली आहे.