चंद्रपुर जिल्ह्यातील नारंडा येथील पूर्ववत सुरू झालेली मुरली सिमेंट कंपनी(दालमिया भारत) मध्ये जुन्या व स्थायी कामगारांना पूर्ववत त्याच स्वरूपात समाविष्ठ करावे अशी मागणी भारतीय सिमेंट मजदूर संघ यांच्यातर्फे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे करण्यात आली.यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अँड.शैलेश मुंजे,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,किशोर राहुल,अनिल बंडीवार यांचे तर्फे निवेदन सादर करण्यात आले.
मुरली सिमेंट कंपनी ही सन २०१५मध्ये बंद झाली होती त्यानंतर सन २०२०मध्ये कंपनी सुरू झाली आहे.कंपनी बंद झाली तेव्हा स्थायी व कंत्राटी असे एकूण ९४७ कामगार होते.आता कंपनी पूर्ववत सुरु झाल्यावर सर्व कामगारांना आपल्याला पूर्ववत कंपनी मध्ये रोजगार मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे.
तरी जुने जे ३०६स्थायी कामगार व बाकी कंत्राटी कामगार होते त्यांना पूर्ववत त्याच विभागात कामावर समाविष्ठ करून घ्यावे तसेच नवीन स्थनिक कामगारांनाच कामावर घेण्यात यावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
तसेच आपण सदर प्रकरणावर केंद्रीय साहाय्यक कामगार आयुक्त व कंपनी प्रशासन व भारतीय सिमेंट मजदूर संघ यांची संयुक्त बैठक लावून सदर विषयांवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.
यावेळी भारतीय मजदूर सिमेंट संघातर्फे रामरूप कश्यप, सत्यवान चामाटे, राजू गोहणे,संजय चहानकर,अजय खामनकर, अजय तिखट उपस्थित होते.