ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू : पॉसिटीव्ह गंभीर रुग्णांचि शासकीय कोविड केअर सेन्टरवर हेळसांड : नातेवाईकांनी केली दगडफेक #covid-care-center - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू : पॉसिटीव्ह गंभीर रुग्णांचि शासकीय कोविड केअर सेन्टरवर हेळसांड : नातेवाईकांनी केली दगडफेक #covid-care-center

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असताना जिल्हातील सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक तक्रारी नातेवाईक करीत आहेत. मात्र प्रशासन सातत्याने याकडे कानाडोळा करीत असून रुग्णांना योग्य सुविधा पुरविण्याचे प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरविणारी घटना काल शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील अग्रणी कोविड रुग्णालयात घडली.या महिलेस तात्काळ उपचाराअभावी जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे. 
सविस्तर माहिती नुसार कोविड रुग्णालयात एक महिला शुक्रवारी दाखल झाली. कोरोनाबाधित असल्याने तिची ऑक्सिजन पातळी खालावली होती. नातेवाईकांनी व्हील चेअरवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिचे नातेवाइक ऑक्सिजनची आणि तातडीच्या उपचाराची मागणी करीत होते. 
परंतु गंभीर स्तिथीत असलेल्या या महिलेस उपस्थित डॉक्टर किवा कर्मचार्यांनी तिला दाखलहि करून घेतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी कोविड केअर सेंटर समोर आरडाओरड केल्यानंतर तासाभरानंतर तिला बेड तर मिळाला परंतु ऑक्सिजन पातळी अधिकाधिक खालावत गेल्याने तिचा मृत्यु झाला. त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी वेळेवर ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे फक्त एका नर्स ने नातेवाईकांच्या विनवणी वर सांगितले प्रत्यक्षात मात्र एकही डॉक्टर ने तिला तात्काळ येऊन तपासणी केली नाही. त्यामुळे संतप्त होऊन नातेवाईकांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे. 
चंद्रपुरातील शासकीय कोविड केअर सेंटर वर दररोज अश्या प्रकारच्या  अनागोंदी कारभाराच्या घटना समोर येऊनही व गंभीर रुग्णास तात्काळ इलाज पुरविला जात असल्याचे समर्थन जिल्हा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे असल्याचे या घटनेवरून उघड होते.