राजुरा येथे पन्नास खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत सुरु #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथे पन्नास खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत सुरु #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. 
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज दिनांक नऊ ऑक्टोबर ला रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुडमेथे ,डॉक्टर बांबोळे, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर अमित चिद्धमवार, डॉक्टर डाखोळे, डॉक्टर अनिता आरके, डॉक्टर शेख ,डॉक्टर स्नेहल डाहूले, डेडिकेट कोवीड हेल्थ केअर सेंटर प्रमुख डॉक्टर विवेक लांजेकर, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
राजुरा तालुक्यातील रुग्णांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर तान वाढलेला आहे. कोविड उपचारासाठी प्रत्येक रुग्णांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात येते.त्यामुळे राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केलेले होते. 
त्यामुळे अनुषंगाने आमदार सुभाष धोटे यांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून याबाबत मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून पन्नास खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत आलेल्या रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे.