महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : नत्थुराम सारख्या प्रवृत्तिच्या माथेफिरू समीर केन्हेला तात्काळ अटक करा : चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांची पोलिसात तक्रार #congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : नत्थुराम सारख्या प्रवृत्तिच्या माथेफिरू समीर केन्हेला तात्काळ अटक करा : चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांची पोलिसात तक्रार #congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु गांधीजींचे विचार हि प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीचा समीर केन्हे या माथेफिरूने समाज माध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापुशी करत अन्य आक्षेपार्य विधान केले आहे. या माथेफिरू विरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे, पोलीस निरीक्षक श्री. बहादूरे शहर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन येथे चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांनी तात्काळ दाखल केली आहे. या माथेफिरूला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 




यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण कॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, कुणाल चहारे, राजू वासेकर, पप्पू सिद्धीकी यांची 




देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर देशाने चालावे. असा संदेश दिला आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील समीर केन्हेला नावाच्या माथेफिरू समाज माध्यमावरून महात्मा गांधी विरोधात प्रक्षेपक विधान त्याने केले आहे. त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तुलना बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांच्याशी केली आहे. हि गंबीर बाब आहे. 




हा प्रकार अतिशय गंभीर असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच नव्हे तर समस्त भारतीय जनतेच्या अपमान आहे. समाजातील सामाजिक स्वस्थ बिगडू नये याकरिता समाजातील अशा माथेफिरुला तात्काळ अटक करा. अशी मागणी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी केली आहे.