योजनांच्या फक्त घोषणा - अंमलबजावणी मात्र शून्य : नरेश पुगलिया #congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

योजनांच्या फक्त घोषणा - अंमलबजावणी मात्र शून्य : नरेश पुगलिया #congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी भरपूर घोषणा केल्या. पण, त्याची अंमलबजावणी शुन्य आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन शुक्रवारी माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवा नेता राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. शहरी व ग्रामीण भागात दर दिवशी 200 ते 400 बाधित आढळून येत आहेत. दररोज पाचहून अधिक लोकांचा बळी जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रूग्णालयात केवळ 160 प्राणवायू खाटांची व्यवस्था आहे.त्यामुळे 16 ते 20 खाजगी रूग्णालयांना कोरोना रूग्ण घेण्याची मुभा देण्यात आली. पण, सामान्य जनतेला 2-3 लाखांचा खर्च परवडण्यासारखा नाही. परंतु, पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी 300 प्राणवायू खाटा व व्हेंटीलेटर शासकीय रूग्णालयात उपलब्ध होतील. तसेच सैनिकी शाळेत 400 खाटा, 40 रूग्णवाहिका, औषधींचा मुबलक साठा, डॉक्टर्स व इतर कर्मचार्‍यांनी त्वरित भरती करण्याची घोषणा केली. दीड महिना लोटला. मात्र, एकाही घोषणेची पूर्तता झाली नाही.
त्यामुळे 16 ते 20 खाजगी रूग्णालयांना कोरोना रूग्ण घेण्याची मुभा देण्यात आली. पण, सामान्य जनतेला 2-3 लाखांचा खर्च परवडण्यासारखा नाही. परंतु, पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी 300 प्राणवायू खाटा व व्हेंटीलेटर शासकीय रूग्णालयात उपलब्ध होतील. तसेच सैनिकी शाळेत 400 खाटा, 40 रूग्णवाहिका, औषधींचा मुबलक साठा, डॉक्टर्स व इतर कर्मचार्‍यांनी त्वरित भरती करण्याची घोषणा केली. दीड महिना लोटला. मात्र, एकाही घोषणेची पूर्तता झाली नाही.त्यामुळे बाधित रूग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा सपाटा सुरू केला. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेचे हाल होत असून, आरोग्य यंत्रणेच्या कमतरतेमुळे कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचारीही हतबल झाले आहेत.
जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांनी सर्व बाबी गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, मजदूर काँग्रेसच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. 700 प्राणवायू खाटांची व्यवस्था त्वरित करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र बेले, अशोक नागापूरे, जिप सदस्य शिवचंद काळे, वसंत मांढरे, रामदास वाग्दरकर, अजय मानवटकर, सागर बलकी, विपेंद्र आर्या, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, बि. के. मून, अ‍ॅड. पवन मेश्राम, चेतन गेडाम, दुर्गेश चौबे, प्रतिक तिवारी आदींची उपस्थिती होती.