गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत#chandrpur:Nippon dendro - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत#chandrpur:Nippon dendro

Share This


खबरकट्टा/चंद्रपूर: 

अमृत दंडवते 

गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत

# निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्पासाठी ना शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा 
# खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली जागे बाबत माहिती 
# संबंधित जागेच्या फाईल्स मागवल्या 
# मा. शरदचंद्रजी पवार जानेवारी महिन्यात करणार जागेची पाहणी 

चंद्रपूर : गेल्या २४ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३ हेक्तर नवीन अद्यापावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने हि जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. 

उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून सध्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. याच जमीनीवर नवीन प्रकल्प व्हावा यासाठी ना. शरद पवार यांची खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर सिल्वर ओक मुंबई येथे भेट घेतली. येथील पायाभूत सुविधा व जमिनींबाबतची माहिती ना. शरद पवार यांना दिली. 


योगायोगाची गोष्ट म्हणजे या वीज प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान नरसिहराव यांच्या हस्ते झाले होते. व त्यावेळेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ना. शरद पवार हे सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थित होते. या जागेवर ऊर्जा, पोलाद किंवा इतर कोणताही मोठा उद्योग आणण्यासाठी स्वतः खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी साकडे घातले असता, त्याच जागेबाबत माहिती दिली व संबंधित जागेचे कागदपत्र पाठविण्याबाबत सांगितले. जागा योग्य असेल तर या ठिकाणी उभारण्यास हरकत नाही असे त्या उद्योगपतींनी ना. शरद पवार यांना सांगितले. 
त्यानंतर निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल त्वरित तयार करण्याबाबत खा. धानोरकर यांनी नगराध्यक्ष अनिल धानोरकरांना सांगितले. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जानेवारी महिन्यात ना, शरद पवार येणार आहे. त्यावेळी संबंधित जागेची पाहणी करण्याबाबतची माहिती त्यांनी दिली. 

भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाल तिठ व चिरादेवी या गावातील हद्द शेतकऱ्याची ११८३. हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. गेल्या २५ वर्षांपासून उपरोक्त जमिनीवर कोणताही प्रकल्प नाही. जमीन पंडित आहे. संपादित क्षेत्राची अंदाजे लांबी ३५०० मीटर व रुंदी १५०० मीटर आहे. भद्रावती शहरापासून सदर जागा सात कि. मीअंतरावर आहे. 

मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वेची मुख्य लाईन, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रीड, जवळूनच गेलेल्या कचा दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा या ठिकाणी आहे. 

या ठिकाणी प्रकल्प झाल्यास भद्रावती परिसरातील रोजगारनिर्मिती होऊ शकते तसेच बाजारपेठेवर सुद्धा सकारात्मक परिणाम होऊ शकते. या प्रकल्पामुळे या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प त्वरीत करण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी ना. शरद पवार यांच्याकडे केली.