खबरकट्टा / चंद्रपूर :
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे मु‘य अभियंता यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक‘मानुसार, चिचडोह बॅरेजचे 15.00 मीटर लांबीचे व 9.00 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सावली तालुक्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेटगाव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड बुज, लोंढोली, ऊसेगाव, कापसी व उपरी या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
15 ऑक्टोबरपासून चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे प्रथम नदी काठावरील व क‘माक‘माने नदीच्या मध्यभागातील द्वारे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात ऊर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.
वाढलेल्या पाणीसाठी यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व गावकर्यांना ग‘ामपंचायतीने दवंडी द्वारे सूचित करावे व नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये काम करताना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन चंद्रपूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एन. वाकोडे यांनी केले आहे.
तसेच या कार्यालयाकडून ज्या शेतांचे भूसंपादन, सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व येत आहे. त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडित क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करू नयेत, सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातून नदी ओलांडू नये. तसेच रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणार्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.