इर्शाद शेख व विहिरगावतील नव तरूण युवकांच्या सहकार्याने ढोल ताशाच्या आवाजात देशसेवा करणाऱ्या युवकाला दिला आगळावागळा निरोप#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इर्शाद शेख व विहिरगावतील नव तरूण युवकांच्या सहकार्याने ढोल ताशाच्या आवाजात देशसेवा करणाऱ्या युवकाला दिला आगळावागळा निरोप#chandrapur

Share This

इर्शाद शेख व विहिरगावतील नव तरूण युवकांच्या सहकार्याने ढोल ताशाच्या आवाजात देशसेवा करणाऱ्या युवकाला दिला आगळावागळा निरोप,

खबरकट्टा/चंद्रपूर,

कोरोनाच्या संकटकाळात एका सर्वसाधारण कुटुंबातील २० वर्षीय तरूणाला गोड बातमी मिळाली. बातमी होती भारतीय सैनिकात निवड झाल्याची.गावच्या गल्लीत आपणासोबत खेळणारा मित्र सैनिक होतोय या भावनेन अतिआनंदी झालेल्या गावातील तरूणांनी वाजतगाजत,फटाके फोडून,ढोलताशाच्या गजरात फटाखे फोडून आपल्या सूपुत्राला जाहीर सत्कार व निरोप दिला.


हा गावकऱ्यांच्या साहाय्याने केलेला उपक्रम खूप कौतुकस्पद आहे.या उपक्रमामुळे गावातील युवा मुलांना नवीन ऊर्जा मिळेल  

या निरोप समारंभ प्रसंगी गावचे माजी उपसरपंच ईशाद शेख, सुधाकर चंदनखेडे माजी सरपंच रामभाऊ देवईकर, सचिन येलमुले, रमेश येरेवार, सुरेश खेडेकर, गणेश चंदनखेडे, आशिष मोहुलै , दिपक खेडेकर, रोहित येरेवार,मयुर वांढरे, संकेत वांढरे,प्रफुल चंदनखेडे,निखिल आस्वले ,साहिल उपलांचीवार,स्वप्नील वाढई,संकेत खेडेकर, केतन वांढरे, संदीप साळवे, सचिन खेडेकर, व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.