जेवढी मेहनत, तेवढे यश विजय मुसळे : गुणवंत गौरव सत्कार सोहळा#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेवढी मेहनत, तेवढे यश विजय मुसळे : गुणवंत गौरव सत्कार सोहळा#chandrapur

Share This

जेवढी मेहनत, तेवढे यश

विजय मुसळे : गुणवंत गौरव सत्कार सोहळा,

खबरकट्टा/प्रतिनिधी

चंद्रपूर : स्पर्धा परीक्षा व इतर आवडीच्या क्षेत्रात जाण्याची तयारी करीत असताना आयुष्यात अनेक अडचणी येतात. मात्र, त्या अडचणी कशा पद्धतीने हाताळता त्याला आर्ट ऑफ लाईफ म्हणतात. यात जेवढी जास्त मेहनत घेतली, तर तेवढे जास्त यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन एसपी बँकिंग क्लासेसचे संचालक तथा करिअर सल्लागार विजय मुसळे यांनी केले. 

कुणबी समाज मंडळ चंद्रपूरच्या वतीने गुणवंत गौरव सोहळा २०२० कार्यक्रम यु-ट्यूब ऑनलाइन स्वरूपात पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्हणून मुसळे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव अतुल देऊळकर उपस्थित होते. 

दहावी हा आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. कोणत्या क्षेत्रात जायचे हे त्याच काळात ठरवावे लागते. नीट, जेईई, स्पर्धा परीक्षा, आर्किटेक्ट, व्यवसाय व इतर क्षेत्रात जाण्यासाठी सकारात्मक विचार ठेवून प्लॅन ए व बी तयार ठेवावा लागतो. जेणेकरून कुठे ना कुठे यश निश्चितपणे पदरी पडते. अनेक क्षेत्रातील संधी शोधून यश संपादन करावे, असेही आवाहन मुसळे यांनी यावेळी केले.

यावेळी पीएच. डी. पदवी प्राप्त राजू पिदूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच १० व १२ वीतील गुणवंत विद्याथ्र्यांचा गौरव करण्यात आला. 

समाजात इंजिनिअर, डॉक्टरची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता गुणवंतांनी युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून समाजाची सेवा करावी. तसेच उद्योग क्षेत्रात युवकांनी यावे, असे प्रास्ताविकपर भाषणातून अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी सांगितले. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी, तर आभार अस्मिता गौरकार यांनी मानले. आयोजनासाठी समाज मंडळाच्या पदाधिकाèयांनी सहकार्य केले. गुणवंत विद्याथ्र्यांनी प्रमाणपत्राची मुळप्रत कुणबी समाज मंडळ, लक्ष्मीनगर, चंद्रपूर या कार्यालयातून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.