अत्याचार दोन - मात्र आरोपी एकच : अल्पवयीन मुलगी व कुमारिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अत्याचार दोन - मात्र आरोपी एकच : अल्पवयीन मुलगी व कुमारिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक#chandrapur

Share This


अत्याचार दोन - मात्र आरोपी एकच : अल्पवयीन मुलगी व कुमारिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

खबरकट्टा / चंद्रपूर:भद्रावती

शहरातील एका अल्पवयीन मुलीवर व कुमारीके वर अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसात गुन्हा दाखल होता. तपासात उघड माहिती नुसार या दोन्ही घटनेतील एकच आरोपी असून त्याला अटक करण्यात आली.

यातील सुरज रमेश मून वय 27 राहणार गुरुनगर भद्रावती असे आरोपीचे नाव असून याने 20 ऑक्टोबरला पहिल्या घटनेत मित्रांसोबत वणी येथे गेलेल्या 16 वर्षीय भंगाराम वार्ड येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला धकधपट करून. भद्रावती कडे आणत असताना डोली पेट्रोल पंप समोरील झुडपी जागेत त्या मुलीला नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.

तर दिनांक 21 ऑक्टोंबर ला दुसर्‍या घटनेत सुरक्षा नगर येथे राहणाऱ्या 19 वर्ष कुमारिका घरी असताना हा युवक घरी आला व त्याने तुझ्या भावाला कुणीतरी मारहाण करत आहे तू लवकर चल असे म्हणून तिला गाडीवर बसवून फुकट नगर येथील झुडपी जंगलात घेऊन गेला व तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला या दोन्ही घटनेमधील आरोपी सुरज मून हाच असून फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास सपोनि संतोष मस्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.