ओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे सायकल रॅली चे स्वागत#Chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे सायकल रॅली चे स्वागत#Chandrapur

Share Thisओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे सायकल रॅली चे स्वागत#Chandrapur

खबरकट्टा/प्रतिनिधी

ओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे प्रा. अनिल डहाके यांच्या सायकल यात्रेचे ग्रामस्थां द्वारे जोरदार स्वागत करण्यात आले. ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी काढण्यात आलेल्या सायकल यात्रेत प्रा. अनिल डहाके, प्रशांत खुसपुरे, प्रा. सुनील वडस्कर, हरिदास पाउणकर हे उपस्थित होते, यांचे स्वागत हार व पुष्पगुच्छ देऊन तसेच ओबीसी जनगणनेचे नारे देत करण्यात आले. यावेळी ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती समाजाचे असंख्य युवा वर्ग व गावकरी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक करण्यात आले, प्रास्ताविक नंतर प्रा. अनिल डहाके ओबीसी जातीनिहाय जनगणनेचे महत्व व गरज सांगताना म्हणाले की, "ओबीसी समाजाने जनगणनेसाठी प्रण करावा व ओबीसी जातनिहाय जनगणना होत नसेल तर सर्वांनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा. 2021 च्या जनगणनेत ओबीसी (VJ, DNT,NT, SBC) चा स्वतंत्र कॉलम नसेल तर आमचा जनगणनेत सहभाग नाही अशा आपल्या घरोघरी पाट्या लावाव्या." ते पुढे म्हणाले, 'जातनिहाय जनगणनेला 90 वर्षाचा काळ लोटला पण अजूनही ओबीसी ची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली नाही, पहिली जातनिहाय जनगणना स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांनी 1931 ला केली, जनगणना दर दहा वर्षांनी होते पण अजूनही ओबीसी ची जनगणना केली गेली नाही, येणाऱ्या 2021 च्या जनगणनेत आपण सर्वांनी प्रण घ्यावा व ओबीसी च्या जातनिहाय जनगणनेसाठी समाजात जागृती निर्माण होण्यासाठी महापुरुषांचा जयघोष, जय ओबीसी जय संविधान चे नारे देत गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रा. अनिल डहाके, प्रशांत खुसपुरे सर, प्रा सुनील वडस्कर , हरिदास पाऊणकर तसेच मराठा सेवा संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश मालेकर हे उपस्थित होते. या संपूर्ण सायकल रॅलीचे आयोजन गावातील युवक मंडळ यांनी केले, सायकल रॅली मध्ये प्रास्ताविक व सूत्रसंचालन अतुल येरगुडे व आभार प्रदर्शन प्रवीण अटकारे यांनी केले, यावेळी गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यात एकनाथ निखाडे, आशिष मासिरकर, स्वप्निल मा. येरगुडे, राहुल कांबळे, श्रीकांत भोयर, अक्षय मासिरकर, स्वप्निल आग्रे, प्रणल देवाळकर, संकेत निखाडे, निखिल थेरे, निखिल निखाडे, मिलन मासिरकर, सुरज माथुलकर, स्वप्निल म. येरगुडे, योगेश मत्ते, प्रफुल ढेंगळे, धिरज बोनसुले, मेघराज उलमाले, दिपक अटकारे, शुभम निमकर, रोहित पोतराजे, अजय झाडे, गणेश निखाडे, निखिल भोयर, स्वप्निल थेरे, रवींद्र देवतळे, समीर नागरकर, पवन येरगुडे, निखिल भोयर, साहिल पिंपळशेंडे, आणि रंजना भोयर, साक्षी पिंपळशेंडे, मनीषा भोयर, सुप्रिया निखाडे, प्राची ढेंगळे, श्वेता भोयर, वैशाली उलमाले, पोर्णिमा ढेंगळे, तेजस्विनी उलमाले, समीक्षा उलमाले, प्राची विरुटकर, वैष्णवी निखाडे, सानिका भोयर, महेश्वरी पिदुरकर, आशु निखाडे, प्रिया भोयर यांनी विशेष परिश्रम घेतले