अंनिस द्वारा तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंनिस द्वारा तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन#chandrapur

Share This


अंनिस द्वारा तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,

खबरकट्टा/प्रतिनिधी:चंद्रपूर

अमृत दंडवते

चंद्रपूर:- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्व विदर्भाच्या वतीने दिनांक 30 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवशीय ऑनलाईन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान होणारे सदर शिबिर निःशुल्क असून या शिबिरात समितीची देवधर्म विषयक भूमिका, जादूटोणाविरोधी कायदा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संत परंपरा, भूत, देवी अंगात येणे, मंत्र-तंत्र करणे, जादूटोणा, अघोरी प्रथा, बुवाबाजी, चमत्कार (प्रात्यक्षिकांसह) आदि विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.

सदर महत्वपूर्ण शिबिरात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/WekviYRdshTrqyDi8 या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी 8847716282, 9404111968, 9860272776, 8806713386 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, जिल्हा महिला संघटिका रजनी कार्लेकर, प्रदीप अडकिने निलेश पाझारे, प्रा. बालाजी दमकोंडवार, संजय घोनमोडे, किशोर शहा आत्राम, निखिलेश चामरे, किशोर नगराळे यांनी केले आहे.