नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. यामुळे जिल्ह्याती सर्व 17 कार्यालयातील खरेदी विक्रीचे व नोंदणीच्या कामांद्वारे मिळणारा एक दिवसांचा सुमारे एक कोटीं रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा अंदाज कर्मच्यांकडून व्यक्त होत आहे. तर काम बंद असल्याने नागगरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चंद्रपूर शहरात दुय्यम निबंधकाचे दोन, सहजिल्हा निबंधक कार्यालय तसेच जिल्ह्यात 14 असे एकूण 17 कार्यालय आहेत. या कार्यालयात शेतीव जमिन खरेदी विक्री, गहाणखते, दस्त नोंदणी, मालमत्तेची नोंदणी आदी कामे केली जात असतात. त्यातून दिवसापोटी 1 कोटी रुपयांचा महसुल शासनाला मिळत असतो. मात्र बुधवारपासून राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. 
तर कामाकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. या आंदोलनात नोंदणी व मुद्राक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एन. माहोरे, सचिव व्ही. एम. एम. बोरकर, उपाध्यक्ष पी. पी. चिडे, आशिष राठोड, भारवी जिवणे यासह जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देण्यात यावी तसेच अनुकंपा तत्वावर एकाला नोकरी द्यावी, सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांची विमा सुरक्षा द्यावी, तुकडेबंदी व रेरा कायद्याद्वारे करण्यात आलेली कारवाइ मागे घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.
कार्यालयात अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. मात्र त्याची शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे.- बी. एन. माहोर, जिल्हाध्यक्ष (नोंदणी व मुद्राक विभाग कर्मचारी संघटना, चंद्रपूर)