अनिकेत दुर्गे शिक्षणप्रेमी पुरस्काराने सन्मानित..... शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थेने घेतली अनिकेतच्या कार्याची दखल#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अनिकेत दुर्गे शिक्षणप्रेमी पुरस्काराने सन्मानित..... शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थेने घेतली अनिकेतच्या कार्याची दखल#chandrapur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर

अनिकेत दुर्गे शिक्षणप्रेमी पुरस्काराने सन्मानित.....

शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थेने घेतली अनिकेतच्या कार्याची दखल,,,

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडले असतांना त्याचा प्रादुर्भाव वाढू नये.यासाठी भारतभर लॉकडाऊन करण्यात आले. या संकटात शाळाही तात्पुरत्या काळासाठी ताळेबंद करण्यात आल्या.

अशा संकटात स्वगावी परतलेल्या अनिकेत नामेश्र्वर दुर्गे या युवकाच्या मनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे काय होणार? हा विचार सतत गोंगावत होता.त्या विचारातून त्यांनी आपल्या घरालगत असलेल्या विहारात ज्ञानशाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत अनेक उपक्रमातून बोलते करून शिक्षणाचा खंडित प्रवास पुन्हा सुरू केला.त्याचे हे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले.

शिक्षणप्रेमी अनिकेतच्या या असामान्य कार्याची दखल याच गावातील शूर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं. तळोधी या संस्थेने घेऊन एका छोटेखानी समारंभात ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष मान. मारोती अम्मावार व सचिव भानेश कंकलवार यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि उत्कृष्ठ शिक्षणप्रेमी पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

याप्रसंगी गणेश बोर्लावार, विक्रांत बोर्लावार तसेच ज्ञानशाळेतील सर्व चिमुकले उपस्थित होते.