अंधारलेल्या घरात उजळणार प्रकाश; आ.मुनगंटीवार यांचा एक कॉल ठरला निर्णायक कामगारांचे जीवन प्रज्वलंत 'कडू' ने झाले 'गोड'#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंधारलेल्या घरात उजळणार प्रकाश; आ.मुनगंटीवार यांचा एक कॉल ठरला निर्णायक कामगारांचे जीवन प्रज्वलंत 'कडू' ने झाले 'गोड'#chandrapur

Share This


अंधारलेल्या घरात उजळणार प्रकाश; आ.मुनगंटीवार यांचा एक कॉल ठरला निर्णायक

कामगारांचे जीवन प्रज्वलंत 'कडू' ने झाले 'गोड

खबरकट्टा/प्रतिनिधी:

अंधारलेल्या जीवनात प्रकाश यावा आणि सारे जीवन उजळून जावे हे प्रत्येकाच्या जीवनात असणार असे नाही परंतु एखाद्याचा आधार मिळावा आणि त्यामाध्यमातून त्याचे जीवन उजळावे, असाच प्रकार बाबूपेठ येथील २२ कामगारांसोबत घडला. भाजयुमोचे युवा नेते प्रज्वलंत कडू यांना कळताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामाध्यमातून त्या कामगारांची दिवाळी साजरी करण्याचा प्रश्न मिटला.

आ सुधीरभाऊ मुनगंटीवार नेहमी म्हणतात"कोण काय करत आहे,यापेक्षा मी काय करत आहे"याकडे लक्ष दिले तर,आपण अनेकांचे प्रश्न सोडवू शकतो.हाच धागा पकडून भाजयुमोचे युवा नेते प्रज्वलंत कडू यांनी कामगारांचे एक प्रकरण आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने निकाली लावले. त्यामुळे आता त्या कामगारांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे.

कोरोना संकटाने अनेकांना बेरोजगार केले.तर काही ठिकाणी कामगार नसल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाही.अनेकांना नंतर कमी पैशात मिळेल ते काम स्वीकारावे लागले.असाच प्रकार बाबूपेठ येथील २२ कामगारांसोबत घडला.हे कामगार पोटाची खळगी भरण्यास नागपूरच्या एका कम्पनीत पोहोचले.आणि ते तुटपुंज्या रकमेत काम करण्यास तयार झाले.सी.सी.रोड (सिमेंट-काँक्रीट) चे हे काम केल्यावर,कम्पनीने मात्र नजर फिरवली.परिणामी ५३ दिवसाची मजुरी सोडून कामगारांना परतावे लागले.हा दुर्दैवी प्रसंग कामगारांनी राजेश यादव यांचे माध्यमातून युवानेते प्रज्वलंत कडू यांना विशद केल्यावर,कडू यांच्यातील संवेदनशील मन अस्वस्थ झाले.या कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी कामगारांचे एक शिष्ठमंडळ घेऊन आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वृत्तांत सांगितला.विषयाचे गांभीर्य ओळखून आमदार मुनगंटीवार यांनी लगेच त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनिवर खडसावले परिणामी कामगारांचे ५३ दिवसांची मजुरी देण्यास कम्पनी तयार झाली,तात्काळ कामगारांच्या हातात त्यांच्या हक्काची रक्कम आल्याने कामगार सुखावले आहेत.

सुब्रत ठेकेदार, कपुर दास, महते,अहिर हलदर ,राजू झाडे, नागेश वाघमारे, दत्तू पवार, वैभव सोनटक्के ,समीर बावणे, हेमराज तिवारी, अक्षय मराठे, संदेश निमगडे, दिनेश सोयाम, धर्मेंद्र रामटेके याप्रमाणे एकूण २२ कामगारांना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मुळे न्याय मिळाल्याने आता आमच्या घरी दिवाळी साजरी होईल अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.