खबरकट्टा / चंद्रपूर : ओळख पटवा -
24 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अंदाजे 50 वर्ष वयोगटातील एक अनोळखी पुरुष एक किलोमीटर दक्षिणेस वायगाव ते दुधाळा रोडवर मृत अवस्थेत आढळून आला आहे.7 दिवस लोटूनही मृत इसमाची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक व्हि. बी. मोरे यांनी केले आहे.
सावळा रंग, उंची 5 फुट 2 इंच, केस काळे-पांढरे घुंगराले, दाढी व मिशी काळी पांढरी वाढलेली, चेहरा गोल, अंगात शर्ट नसून कमरेला सिमेंट रंगाचा फुल पॅन्ट व लाल रंगाचा धागा आहे. पेहराव व राहणी मानावरून इसम मनोरुग्ण असल्याचे दिसून येते.
वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर पोलीस स्टेशन रामनगर 07172-253200, पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपुर 07172-273258, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्हि.बी मोरे मो.क्र.9657720560 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.