वैनगंना नदीवर अपघात : मुलगी जखमी, मुलगा बेपत्ता#chandrapur: bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वैनगंना नदीवर अपघात : मुलगी जखमी, मुलगा बेपत्ता#chandrapur: bramhapuri

Share This
खबरकट्टा/ब्रम्हपुरी
प्रतिनिधी

16 ऑक्टोबर रोज शुुुक्रवार ला सायंकाळी 6 वाजता च्या दरम्या्न आरमोरी ते ब्रम्हपुरी- मुख्य महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावर मुलगा व मुलगी हे दोघेही दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी ही वैनगंगा नदीपुलाच्या डिवायडरला आपटलि आणि तोल जावुन मुलगा नदीत पडला तर मुलगी पुलावर पडून जखमी झाली. मुलगा व मुलगी दोघेही स्पेडर गाडि MH49BF3593 ने जात असताना अचानक गाडी लोखंडी खांबालाआपटली .त्यानंतर नियंत्रण सुटल्याने

त्यामध्ये दुचाकी चालक मुलाचा तोल जावून नदीपुलावरून नदीपात्राच्या पाण्यात पडून लुप्त झाला तर मुलगी ही पुलावर पडल्याने त्यामध्ये दुचाकी स्वार मुलगी जखमी झाली.

लगेच दुचाकी स्वाराला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असता दुचाकी स्वारांचा अजून पत्ता लागला नाही.

दुचाकी चालक मुलाचे नाव इरफान शेख तर मुलिचे.नाव कळू शकले नाही.

दुचाकीचालक मुलगा हा दुचाकीस्वार मुलीला दुचाकी चालविण्याचे शिक्षण देत होता.

घटनेचा तपास सुरू असून नदीपात्राच्या पाण्यात लुप्त झालेल्या दुचाकी चालकाचा शोध संबंधीत विभाग करीत आहे.