घरी राहूनच दसरा साजरा करण्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांचे आवाहन#chandraour - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरी राहूनच दसरा साजरा करण्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांचे आवाहन#chandraour

Share This


घरी राहूनच दसरा साजरा करण्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांचे आवाहण,

खबरकट्टा/चंद्रपूर

संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे सावट आहे. या काळामध्ये सदैव मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. यावर्षी दसरा हा सण घरी राहूनच साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र एक करून कोरोना विरुद्ध लढाई देत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोरोना महामारी मध्ये लढणाऱ्या कोरोना योध्द्यांना साथ द्यावी. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबा समवेत घरातच राहून दसरा हा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.