तब्बल सात महिन्यानंतर ब्रह्मपुरी मध्ये भरला आठवडी बाजार ग्राहकांमध्ये समाधान खरेदीसाठी उसळली गर्दी#bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तब्बल सात महिन्यानंतर ब्रह्मपुरी मध्ये भरला आठवडी बाजार ग्राहकांमध्ये समाधान खरेदीसाठी उसळली गर्दी#bramhpuri

Share This


तब्बल सात महिन्यानंतर ब्रह्मपुरी मध्ये भरला आठवडी बाजार

ग्राहकांमध्ये समाधान

खरेदीसाठी उसळली गर्दी,

खबरकट्टा/प्रतिनिधी

ब्रह्मपुरी येथील आठवडी बाजार कोरोणा च्या प्रकोपामुळे त्याचप्रमाणे त्याचा प्रसार होऊ नये यासाठी मार्च दोन हजार वीस पासून तब्बल सात महिने शासनाच्या आदेशान्वये बंद होता. शासनाने आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रतिबंध हटविल्याने शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर ला पहिला आठवडी बाजार भरला ग्राहकांनी खरेदी साठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले


सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असल्याने शासनाने आठवडी बाजारावर प्रतिबंध लावले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले होते भाजीपाला महागला होता. यातून विक्रेत्यांनी नफेखोरी सुरू केल्याने ग्राहकांना मात्र विकत घेतल्या शिवाय पर्याय नव्हता. परंतु सात महिन्यानंतर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ब्रह्मपुरी येथील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. अन्य गावांमधून भाजीपाला आवक झाल्यामुळे ग्राहकांना थोडा स्वस्त दरात विकत घेता आले. परिणामी ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले परंतु एकाच वेळेस गर्दी निर्माण झाल्यामुळे सोशल डिस्टंसिंग त्याचप्रमाणे मास्कचा वापर हा 100% होऊ शकला नाही. काही नागरिक हे सोशल डिस्टंसिंग चे पालन करताना दिसून आले परंतु गर्दीमध्ये गेल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे इकडे तिकडे बघत त्यांना वस्तू खरेदी करावी लागली. काही ग्राहक मास्क लावून आठवडी बाजारात आले तर काहींना मात्र त्रास होतो म्हणून बिना मास्कने बाजारे मध्ये येऊन वस्तू खरेदी करायला सुरुवात केली