वाघाची दहशत : सकाळी धावण्यासाठी गेलेल्या मुलावर वाघाने हल्ला चढवून केले ठार.!#bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाची दहशत : सकाळी धावण्यासाठी गेलेल्या मुलावर वाघाने हल्ला चढवून केले ठार.!#bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 


तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी मुडझा मुख्य महामार्गावर सकाळी धावण्यासाठी आलेल्या मुलावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे.मृतक मुलाचे नाव नैतिक संतोष कुथे वय वर्षे १० असे असून वांद्रा येथील रहिवासी आहे.प्राप्त माहितीनुसार आज सकाळच्या प्रहरी धावण्यासाठी नैतिक हा मुलांसोबत धावण्यासाठी वांद्रा गावावरून गांगलवाडी- मुडझा मुख्य महामार्गावर गेले असता नैतिक हा मागे होता तर काही मुले समोर धावत होती. तीच संधी बघून नरभक्षक वाघाने चीचगाव गावाजवळ नैतिकवर हल्ला चढवून झुडपामध्ये नेऊन त्याच्या नरडीचा घोट घेऊन ठार केले.
काही वेळानंतर सोबत असलेल्या मुलांनी नैतिक दिसत नाही म्हणून त्याचा शोधा शोध सुरू केला असता मुख्य महामार्गावरून पाचशे फूट अंतरावर झुडपामध्ये मिळाला.नैतिकच्या पच्छात्य कुटुंबात अंदाजे चार जण आहेत.नैतिक हा कुटुंबातील खूप प्रेमळ मुलगा होता.नैतिकच्या जाण्याने कुथे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांद्रा गाव परिसर शोकासागरात बुडाला आहे.
तरी संबधित वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता नरभक्षक वाघाचा संबंधित वनविभागाने जेरबंद करावा.जेरबंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामवासींयांनी व कुथे कुटुंबियांनी दिला आहे.