ऑनलाईन मोबाईल खरेदीत कंपनीने फसवणुक केल्याबद्धल युवकाने केली आत्महत्या #boy commits suicide over company scam in online mobile shopping - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऑनलाईन मोबाईल खरेदीत कंपनीने फसवणुक केल्याबद्धल युवकाने केली आत्महत्या #boy commits suicide over company scam in online mobile shopping

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चिमूर -ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याने मानसिक दबावाखाली येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडली आहे. 


भिसी अप्पर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता त्याची मूळ किंमत १५हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईन च्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्ट मार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला देऊन पार्सल घ्यायचे होते.यासाठी युवकाला पोस्टातून फोन आला. युवकाने पार्सल साडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली .आईने पैशाची जुडवाजुडव करू०ा मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल सोडवायला गेले .सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने व मुला न खोलून पाहिले तर त्या पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी २ पॉकेट ; १ बेल्ट व खाली खरडा अशा बिनकामी वस्तू होत्या.युवकाला आपली मोबाइल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने १५ हजार रुपयांचा भुदंड बसल्याने घरचे आई वडील नाराज झाले होते या युवकाने या गोष्टीचा मनावर परिणाम करून घेतला.मुलगा काल ३ वाजता पासून घरातून गायब होता . आई वडीलाने नातेवाईक , मित्र परीवाराकडे विचारपूस केली असता . त्याचा कुठेच पत्ता लागला नाही .आज दिनांक ९/१०/२०२० ला १०-११ च्या दरम्यान गावातील शेतकरी व महीला शेतात जात असतांना त्या मुलाची गाडी व त्या मुलाचे कपडे विहीरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला.रोहीत ने कमरेला दगडाने भरलेली पोतळी बांधून विहीरीत उडी घेऊन आपला जीव संपविला या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या मोबाईल कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी गांवकरी व कुटुंबातील व्यक्तींकडून केली जात आहे.