चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायास गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज 7 ऑक्टोबर रोजी अटक केली.
आरोपी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे वय 35 वर्ष,पोलीस शिपाई सतीश उकड जाधव वय 30 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांच्या नावे असून ते दोघेही घोट पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत.प्राप्त माहितीनुसार चामोशी तालुक्यातील विष्णुपुर येथील तक्रारदारावर अवैध दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती तक्रारदाराने दरमहा 10 हजार रुपये देण्याचे मान्य केले.
मात्र त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आज 7 ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली तक्रारीमध्ये सत्य असल्याचे आढळून येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोट येथे सापळा रचून रंगेहात अटक केली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार,यांच्या मागदर्शनात पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरिक्षक रवी राजुलवार,सतीश कतीवार,सुधाकर दांडिकवार,देवेंद्र लोंनबले,महेश कुकूडकर,तुळशीराम नवघरे यांनी केली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवि राजूलवार करीत आहे.