खबरकट्टा / चंद्रपूर / चिमुर -तालुका प्रतीनीधी :
लॉक डाउन झाल्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले असतानाच या कठिण काळातही महावितरणने पाठविलेल्या वीज बिलामुळे गोंधळ उडाला असतांनाच चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथील वनीता शिवरकर या विधवा व मोडक्या घरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल ६५ हजार ५२० रुपये इतके बिल महावितरनाने पाठविले वाढीव वीज बिलांचा गरीब महिलेला शॉक दिला होता.
या बाबत प्रसिद्धी माध्यमा मध्ये वृत्त प्रसारित होताच महावितरण विभागणी याची तात्काळ दखल घेत सदर विधवा महिलेच्या घरी महावितरण चे खिरटकर नामक कर्मचारी यांनी नवीन मीटरची जोडणी करून दिले आहे.सदर महिलेस वेळीच न्याय मिळाला आहे त्या मुळे महिलेच्या चेहऱ्यावर तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
सदर मीटरची ची पडताळणी करण्याकरिता मिटर तात्पुरता काढले असून नवीन मीटरची जोडणी करून दिली आहे- ओ. एस. मुकादम कनिष्ठ अभियंता, महावितरण,चिमूर