ब्रेकिंग अपघात : मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले : आज सकाळी 4:30 वाजता दरम्यान ची घटना : दोघे मित्र जागीच ठार #Two were crushed by an unknown vehicle while going for a morning walk - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग अपघात : मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले : आज सकाळी 4:30 वाजता दरम्यान ची घटना : दोघे मित्र जागीच ठार #Two were crushed by an unknown vehicle while going for a morning walk

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी : 
ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील व्यायाम करण्याकरिता गेलेल्या दोन युवकांना पहाटे साडेचारच्या दरम्यान विद्यानगर रुई जवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 9 ऑक्टोंबर ला घडली. खरकाडा येथील प्रशांत मुरलीधर सहारे (वय 20) व रोहित अशोक चट्टे ( वय 20 ) असे मृतकांचे नावे आहेत.रोजच्याप्रमाणे प्रशांत व रोहित हे खरकाडा वरून आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाक करिता खरकाडा ते आरमोरी मार्गावर जात होते 9 ऑक्टोंबर च्या पहाटे विद्यानगर रुई जवळील राईस मिल जवळ रस्त्याच्या कडेला प्रशांत व रोहित हे व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. काही मित्र समोर गेले होते प्रशांत, रोहित हे एकत्र राहायचे प्रशांत व रोहितच्या अपघाताने खरकाडा गावात शोककळा पसरली आहे. 


या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी चे ठाणेदार खाडे, एपीआय बन्सोड व बीट जमादार गेडाम घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेले. अज्ञात वाहनाचा शोध लावण्याची मागणी या वेळी उपस्थितांनी केली.