बिग ब्रेकिंग : चंद्रपूरातील वैद्यकीय सुविधांचा अभाव पोहोचला हाय कोर्टात : जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, डीन, जिल्हाशल्यचिकीत्सकांसहित इतर इतर 4 जणांना हायकोर्टाची नोटीस : माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दाखल केली याचिका - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : चंद्रपूरातील वैद्यकीय सुविधांचा अभाव पोहोचला हाय कोर्टात : जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, डीन, जिल्हाशल्यचिकीत्सकांसहित इतर इतर 4 जणांना हायकोर्टाची नोटीस : माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दाखल केली याचिका

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गेल्या सहा महिन्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. 
ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटरची सुविधा नाही, डॉक्टर्स नाही. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी आता न्यायव्यवस्थेचे हस्तक्षेप करावा म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली आहे. 
या याचिकेअंतर्गत न्यायालयाने नागपूर विभागाचे आयुक्त, चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते शासकीय वैद्यकीय, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, , मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय), तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सैनिकी शाळेत कोविड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, वेळेत हे काम पूर्ण झालेले नाही. शहरातील 17 खासगी रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. 'खासगी डॉक्टरांना विरोध नाही.
पण सर्वसामान्य कोरोनाबाधित रुग्ण लाखो रुपये खर्च करून खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. खासगी रुग्णालयात एका रुग्णाला किमान लाख रुपये खर्च येत आहे. त्यामुळे या सर्व सुविधा राज्य सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण करणे अपेक्षित आहे', असे याचिकाकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांचे म्हणणे आहे.