4 दिवसापासून बेपत्ता युवक आढळला लटकलेल्या मृत अवस्थेत#chandrapur:savli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

4 दिवसापासून बेपत्ता युवक आढळला लटकलेल्या मृत अवस्थेत#chandrapur:savli

Share This


खबरकट्टा/सावली:प्रतिनिधी
सावली तालुक्यातील सोनापूर गावातील 22 वर्षीय युवक राकेश प्रभाकर बावणे हा चार दिवसांपूर्वी बाहेर जाऊन येतो अस सांगून गेला पण त्या दिवशी घरी परत न आल्याने ,घरच्यांनी त्याचा शोधा शोध सुरू केला परंतु 2 दिवस त्याचा पत्ताच लागला नाही.

मात्र तो स्वतःच्या दुचाकीवर चिरोली परिसरात गेल्याची माहिती मिळताच घरच्यांनी पोलिसांना कळवून शोधा शोध सुरू केला असता आज सकाळी त्या युवकाचा मृतदेह चिरोली जंगल परिसरात झाडाला फाशी लागलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.ही आत्महत्या की हत्या अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र या प्रकरणात संशय वाटत असून पोलीस तपास करणार आहे.गावातील चांगला होतकरू युवक चा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.