प्रा.अनिल डहाके यांचे 25 ऑक्टोबरला राजुरात आगमन - ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जातीनीहाय जनगणने करीता संपूर्ण जिल्ह्यात सायकल वारी#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रा.अनिल डहाके यांचे 25 ऑक्टोबरला राजुरात आगमन - ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जातीनीहाय जनगणने करीता संपूर्ण जिल्ह्यात सायकल वारी#chandrapur

Share This


प्रा.अनिल डहाके यांचे 25 ऑक्टोबरला राजुरात आगमन

- ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जातीनीहाय जनगणने करीता संपूर्ण जिल्ह्यात सायकल वारी,

खबरकट्टा/चंद्रपुर:राजुरा

2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी प्रा. अनिल डहाके यांनी 16 ऑक्टोबर पासून सायकल यात्रा काढली आहे. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत ते चंद्रपूर जिल्ह्यात सायकल यात्रा करून गाव ते शहर अशी जनजागृती करणार आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या यात्रेचे सर्वत्र स्वागत होत आहे. दरम्यान 25 ऑक्टोबर 2020 रोजी नांदगाव, विसापूर, बल्लारपूर, बामणी असा प्रवास करीत दुपारी 3 वाजता त्यांचे राजुरा शहरात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिनेश पारखी, उत्पल गोरे, सुरज गव्हाणे, केतन जुनघरी, संतोष देरकर, किसन बावणे, साईनाथ परसुटकर, सुभाष अडवे, बादल बेले, सुरज भामरे, उमेश पारखी, यश मोरे, रितिक बुटले, निलेश बोन्सुले, प्रणव बोबडे, सुजित कावळे, कपिल इद्दे , संदीप आदे , यांच्या द्वारे करण्यात येत आहे. तसेच शहरातील मुख्य मार्गाने ही सायकल यात्रा फिरणार् आहे.