💥चिमूर पोलिसांनी देशी दारूसह 2 लाख 90 हजार .रुपयाचा मुद्देमाल केला जप्त चिमूर येथिल उमा नदीपात्राजवळ केली कारवाई ; दारू तस्करांचे धाबे दणाणले#chimur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

💥चिमूर पोलिसांनी देशी दारूसह 2 लाख 90 हजार .रुपयाचा मुद्देमाल केला जप्त चिमूर येथिल उमा नदीपात्राजवळ केली कारवाई ; दारू तस्करांचे धाबे दणाणले#chimur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर / चिमूर प्रतिनिधी -


1 ऑक्टोबरच्या रात्रौदरम्यान अनिकेत उर्फ दत्तू बावणे, आयुष दाभेकर व महेंद्र कोसरे, ( तिघेही रा. चिमूर ) यांनी चावडी चौक चिमूर, उमा नदीचे पुलाजवळ लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या पेट्या मोटारसायकलने पार्सल करीत आहे, अशा खबरेवरून नमुद ठिकाणावर चिमूर पोलिसांनी जाऊन पाहिले असता 25 नग खोक्यांमध्ये 2,40,000/- रु. चा देशी दारू माल व एक जुनी वापरती जुपिटर मोटरसायकल ( किंमत 50,000 रु. ) असा एकूण 2,90,000/-.रु. चा मुद्देमाल जप्त केला.



चिमूर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध दारू तस्करांविरुद्ध वेळोवेळी कारवाया करीत असून, काही दारू तस्कर पोलिसांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून अवैध मार्गाने दारू तस्करी करीत असतात. परंतु पोलिस निरिक्षक स्वप्निल धुळे त्यांचा पोलिस स्टाफ वेळोवेळी अवैध दारू तस्करांच्या मूसक्या आवळण्याचे काम करीत आहेत.


फरार आरोपी नामे अनिकेत उर्फ दत्तू बावणे, आयुष दाभेकर व महेंद्र कोसरे, यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही उप विभागीय पोलिस अधिकरी, वरोरा (अति. कार्य. चिमुर), श्री. निलेश पांडे, पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पो.हवा. विलास निमगडे, पोशि सचिन खामनकर, भारत घोळवे, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, शंकर बोरसरे, हरीश येरमे यांचे पथकाने पार पाडली.