चिमूर नगरपरिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे वादळ घोंगावनार चिमूर नगरपरिषदेच्या संपूर्ण 17 हि जागा लढवणार#chimur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगरपरिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे वादळ घोंगावनार चिमूर नगरपरिषदेच्या संपूर्ण 17 हि जागा लढवणार#chimur

Share Thisचिमूर नगरपरिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे वादळ घोंगावनार

चिमूर नगरपरिषदेच्या संपूर्ण 17 हि जागा लढवणार

खबरकट्टा/प्रतिनिधी:चिमूर

चिमूर नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहन्यास सुरुवात झाली आहे. अश्यातच वंचित बहुजन आघाडीने संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वॉर्डात आपलं संघटन मजबूत करण्याच्या हालचालीला सुरवात झाली असून, वार्डावार्डात संघटन करण्यास वेग आलेला आहे. यामूळ या वर्षी वंचितांना खऱ्या अर्थाने संधी मिळणार अनेक युवक मंडळी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करीत आहे.

काही दिवसांपूर्वी अनेक नागरिकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला होता. त्यातच काल नगरपरिषद आढावा बैठक वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर च्या वतीने आयोजित केली होती. या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य राजुभाऊ झोडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य महासचिव कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समिती प्रमूख डॉ. रमेशकुमार गजभे, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक अरविंद सांदेकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रविनजी गावतुरे, चंद्रपूर जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे उपस्थित होते.

या बैठकीला ज्येष्ठ मार्गदर्शक परशुराम ननावरे, निळकंठ शेंडे, पत्रुजी दडमल, तसेच वंचित बहुजन आघाडीत नुकतेच प्रवेश केलेले सारंगजी दाभेकर, मधुकरराव गेडाम, आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी राजूभाऊ झोडे हे स्वतः या नगरपरिषद निवडणुकीत लक्ष घालतील अशी ग्वाही या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात दिली. सर्व मान्यवर मंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन करून नगरपरिषद निवडणुकीत आपण जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढू अशी खूणगाठ विनोद सोरदे, मनोज राऊत, भाग्यवान नंदेश्वर, चिमूर तालुका, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळींनी बांधली.

बैठकीचे संचालन शैलेश गायकवाड यांनी तर प्रास्ताविक शालीकजी थुल तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे ध्येयधोरणे या बद्दलची विस्तृत माहिती प्रा.नागदेवते यांनी दिली. या बैठकीचे आभार चिमूर तालुक्याचे अध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे यांनी मानले.

*चिमूर नगरपरिषद निवडणूक मध्ये वंचित समूहाच्या सहकार्याने ही निवडणूक प्रस्थापित पक्षांच्या विरोधात फक्त जनशक्तीच्या ताकतीवर लढणार आणि चिमूर नगर परिषद निवडणूक जिंकणार तसेच येत्या काही दिवसात चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश होईल.*

स्नेहदीप खोब्रागडे, अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी चिमूर